बीड दि.१३ (प्रतिनिधी)-तालुक्यातील एका ३० वर्षीय महिलेचा मृतदेह कुक्कडगाव परिसरातील एका विहिरीत आढळून आला आहे.रात्री उशिरापर्यंत त्या महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते.मृत्युचे कारण आज (दि.१४) सकाळी शवविच्छेदन अहवालानंतर समोर येणार आहे.
बीड तालुक्यातील कुक्कडगाव परिसरात गणेश आठवले यांच्या विहिरीत गुरुवारी (दि.१३) सायंकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून घटनास्थळी पिंपळनेर ठाण्याचे प्रमुख कैलास भारत, पीएसआय खरात, बीट अमलदार मेखले यांनी धाव घेतली होती.रात्री उशिरापर्यंत मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते.आज सकाळी शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण समोर येणार असून मयत महिलेची ओळख देखील अद्याप पटलेली नाही अशी माहिती कैलास भारती यांनी दिली.
बातमी शेअर करा