Advertisement

कुलदीप करपे बीआरएसमध्ये

प्रजापत्र | Wednesday, 12/04/2023
बातमी शेअर करा

बीड दि.१२ (प्रतिनिधी)-स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन शेतकरी नेते कुलदीप करपे यांनी हैद्राबादचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीआरएस पक्षात प्रवेश केला.

कुलदीप करपे यांनी बीड जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढीसाठी मोठे परिश्रम घेतले होते. त्यांच्या बीआरएसमधील प्रवेशामुळे बीड जिल्ह्यात या पक्षाची ताकद वाढणार आहे. मागच्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटेनच्या माध्यमातून कुलदीप करपे यांनी आवाज उठविला होता.जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी आंदोलन,निदर्शनच्या माध्यमातून मार्गी लावले होते.मात्र त्यांनी मंगळवारी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर गुरुवारी हैदराबाद येथे प्रगती भवनात मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये भारत राष्ट्र समिती (बीआरएस) मध्ये प्रवेश केला.यावेळी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक शिवाजीराव घोडके,शेतकरी नेते कमलाकर लांडे ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड तालुकाध्यक्ष लहू गायकवाड पाटील यांनी देखील बीआरएसमध्ये प्रवेश घेतला आहे.

Advertisement

Advertisement