Advertisement

लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीवर पुण्याच्या युवकाकडून अत्याचार

प्रजापत्र | Wednesday, 12/04/2023
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - चक्क लग्राचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असल्याने खळबळ उडाली आहे.

अत्याचारित मुलगी ही अंबाजोगाई शहरात आई आणि भावासोबत राहते. पुणे येथील युवक २३ फेब्रुवारी घरी आला यावेळी आई शिवण काम करण्यासाठी आणि भाऊ शिकवणी क्लास ला गेलेला होता याच संधीचा फायदा घेत युवकाने तुझ्याशी लग्न करतो म्हणून अत्याचार केला. दरम्यान सदरील युवक हा पुणे येथे निघून गेला.

अत्याचारीत मुलगी दोन महिन्याची गर्भवती अन तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी ऋषी दिंडोरो (पुणे) याच्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या शोधत पिंक पथक रवाना झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे.

Advertisement

Advertisement