Advertisement

वदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाश्यांचा हल्ला

प्रजापत्र | Sunday, 09/04/2023
बातमी शेअर करा

मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये चार जण जखमी झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नागभीड तालुक्यातील सातबहिणीचा डोंगर येथे ही घटना घडली आहे. अशोक मेंढे आणि गुलाबराव पोचे यांचा समावेश असून या दोघांचं वय अंदाजे ६० वर्ष आहे. 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, नागभीड तालुक्यात सातबहिणीचा डोंगर येथे महादेवाचे मंदिर आहे. या डोंगरावर मोठ्या प्रमाणात मधमाश्यांचे पोळे आहेत. काल दुपारी देवदर्शनासाठी अनेक भाविक गेले होते. याचवेळी दुपारी अचानक मधमाश्यांनी भविकांवर हल्ला केला.

 

 

मात्र हा डोंगर अतिशय अवघड असल्याने दोन्ही वृद्ध घाईने खाली उतरू शकले नाहीत आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा स्थानिक स्वयंसेवी संस्था कार्यकर्त्यांच्या मदतीने मृतदेह खाली आणण्यात आले.

 

दरम्यान, मधमाश्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक पर्यटक जखमी झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणीत मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला चढवल्याची घटना समोर आली होती. शनिवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास अचानक पर्यटकांवर हल्ला केला. ज्यात 15 ते 20 पर्यटक जखमी झालेत.

Advertisement

Advertisement