आष्टी - तालुक्यातील सुरुडी येथील शेळ्या चारण्यासाठी शेतात गेलेल्या विजांचा कडकडाटासह जोराचा पाऊस आल्याने चिंचेच्या झाडाखाली आडोशा घेऊन बसलेल्या एका शेतकऱ्यांसह दोन शेळ्यांचा (दि.८) एप्रिल रोजी सायं.५ वा.अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.महादेव किसन गर्जे (वय -६०) हे मयत शेतकऱ्यांचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, महादेव किसन गर्जे हे (दि.८) एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा.च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस येऊ लागल्याने शेतात शेळया घेऊन चारण्यासाठी गेलेल्या विजेच्या कडकडटासह व जोराचा पाऊस सुरू झाल्याने चिंचेच्या झाडाखाली आडोशाला बसले असता शेतकऱ्यांचा वीज पडून दुर्देवी मृत्यू झाला तर दोन शेळ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.या घटनेची माहिती सुरुडीचे माजी सरपंच तथा दूध संघ व्हा.चेअरमन अशोक गर्जे यांनी दिली असता तात्काळ घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
गर्जे कुटुंबातील कर्ता पुरुषाचा वीज पडून दुर्देवी मृत्यू झाल्याने सुरुडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,एक मुलगी सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
बातमी शेअर करा