बीड-राज्य सरकरने आजपासून एसटी बसेस जिल्हाअंतर्गत सुरु केल्या.बीड जिल्ह्यातही लालपरी या निर्णयानंतर काही ठिकाणी रस्तावर धावली.मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या पाटोद्यामध्ये जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांनी कंटेन्टमेंट झोन जाहीर केल्याने बीडच्या बस स्थानकातून पाटोद्याकडे जाणाऱ्या सर्व बसेस रद्द करण्यात आल्या.पुढील आदेश येईपर्यंत पाटोद्यासाठी या बसेस सुरु होणार नसल्याची माहिती विभाग नियंत्रक कालिदास लांडगे यांनी 'प्रजापत्र' शी बोलताना दिली.
अर्थ चक्राचा फसलेला गाडा पुन्हा फिरविण्यासाठी राज्य सरकारकडून एसटी बस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत जिल्हाअंतर्गत बस सुरु करण्यास मुभा देण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील ११ ठिकाणी बसच्या प्रत्येकी १२ फेऱ्या होणार होत्या.मात्र शुक्रवारी (दि.२२) सकाळी पाटोदा कंटेन्टमेंट झोन असल्याने त्या ठिकाणी बस सोडणे योग्य नसल्याचे सांगत बीडच्या आगारातून एकही बस पाटोद्याकडे सोडण्यात आली नाही.जिल्हाधिकाऱ्यांकडून पुढील आदेश मिळाल्यानंतर या ठिकाणी बस सुरु करण्यात येतील असे विभाग नियंत्रक कालिदास लांडगे यांनी म्हटले आहे.
बातमी शेअर करा
Leave a comment