Advertisement

कपडे वाळू घालतांना शॉक बसल्याने महिलेचा मृत्यू

प्रजापत्र | Saturday, 01/04/2023
बातमी शेअर करा

बीड - अंगणात कपड़े वाळु घालण्यासाठी बांधलेल्या तारेवर कपडे वाळू घालत असतांना अचानक सर्व्हिस बारमधील विद्युत प्रवाह तारेत उतरल्याने शॉक बसून २७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शहरातील बालेपिर भागातील आमराई परिसरात आज सकाळी घडली. दरम्यान आईला शॉक बसल्याचे पाहून दोन चिमुकले जावुन आईला बिलगली. मात्र जबरदस्त शॉक बसल्यानंतर आईचा जीव गेला, त्यावेळी हातातील तार सुटल्याने दोन्ही मुले बाजूला गेली.

बीड शहरातील बालेपीर आमराई भागात आज सकाळी आफरीन समीर शेख (वय-२७) या महिलेचा विजेचा शॉक बसल्याने मृत्यू झाला. आईला शॉक बसल्याचे पाहून तबिश (वय-दिड वर्ष) आणि अमर (वय-४) ही दोन्ही मुले आईला जाऊन बिलगली. त्यांच्या डोळ्यादेखत आईचा मृत्यू झाला. सदरील घटनेनंतर आफरीन शेख हिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. शेख कुटूंब मुळचे जालना येथील असुन रोजगारासाठी ते बीडला स्थायिक झाले होते. मयत आफरीन हिस रोजा होता. रोजा असतांनाच तिचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मयत आफरीन शेख यांच्या पश्चात पती, नवीश, अमर ही दोन मुले आणि चार मुली असा परिवार आहे.

Advertisement

Advertisement