दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता होमिओपॅथिक डॉक्टर देखील कोरोनाग्रस्तांना औषधी देऊ शकणार आहेत, मात्र ही औषध योजना प्रतिबंधक स्वरूपाची असेल, त्याला कोरोना बरा करणारी औषधी असे स्वरूप देता येणार नाही अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. या संदर्भात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे.
केरळ उच्च न्यायालयाच्या आयुष डॉक्टरांना कोरोना उपचारावर प्रतिबंध घालणाऱ्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने शपथपत्र दिले आहे. त्यात आयुष अंतर्गत येणाऱ्या विद्याशाखांचे डॉक्टर शरीराची प्रतिकार क्षमता वाढविणाऱ्या औषध योजना देऊ शकतात असे स्पष्ट केले असून होमिओपॅथिक डॉक्टर त्यांची नियमित औषध योजना, किंवा प्रतिबंधात्मक औषध योजना, अगदी कोरोनाग्रस्तांना देखील देऊ शकतात,आयुष्य मंत्रालय वेगळे दिशानिर्देश देणार आहे असेही शपथपत्रात म्हटले आहे. फक्त ही औषध योजना कोरोनावरील उपचार म्हणून नव्हे तर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून द्यावी अशी भूमिका केंद्राने घेतली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर असलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा