बीड-माजी ग्रामविकास मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा प्रकृती बिघडली असून त्यांनी आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला आहे.यावेळी त्यांनी ट्वीट करून पदवीधर निवडणुकीच्या मतदानासाठी औरंगाबादच्या मतदारांना भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून आपली तब्येत ठीक नसल्याचे सांगितले आहे. 'सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जबाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे' असं पंकजा यांनी सांगितले आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता पंकजा मुंडे यांनी खबरदारी म्हणून आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला आहे.तसंच आज शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान होत आहे. पंकजा मुंडे यांची औरंगाबाद पदवीधर निवडणुकीसाठी प्रतिष्ठापणाला लागली आहे. त्यामुळे पंकजा यांनी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना पहिल्या पसंदीचे मत देऊन विजयी करावे' असं आवाहन केले आहे.
हेही वाचा
- बिबट्याचा चऱ्हाट्यात महिलेवर हल्ल्याची चर्चा
- अज्ञात वाहनाच्या धडकेत चौघे जखमी,एकाची प्रकृती चिंताजनक