प्रवीण पोकळे
आष्टी - धानोरा येथील पतसंस्थेकडे दोन खातेदारांनी गहाणखत म्हणून ठेवलेल्या दोन हेक्टर क्षेत्रापैकी ४० गुठ्ठे क्षेत्राची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर येताच व्यवस्थापकाच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलिस ठाण्यात दोन तलाठी, एक मंडळाधिकारी याच्यासह कुंबेफळ येथील दोन खातेदार अश्या पाच जणांवर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील धानोरा येथील श्री. स्वामी समर्थ ग्रामीण पतसंस्थेत कुंबेफळ येथील दोन खातेदारांनी दोन हेक्टर आठ गुंठ्ठे क्षेत्र गहाणखत म्हणून ठेवले होते.नंतर संगणमत करून बॅकेचे परस्पर खाते निल केले. बाबतचे खोटे दस्तऐवज तयार करून ते खरे म्हणुन वापरून खोटे शिक्के तयार करून पतसंस्थेच्या नावे असलेले सातबारा उताऱ्यावरील बोजा कमी केला व लालासाहेब रंगनाथ मुठे यांनी बॅकेला गहाणखते ठेवलेल्या क्षेत्रापैकी २ हेक्टर ८ गुंठ्ठे इतके क्षेत्र मुलाच्या नावे वाटणीपत्र केले व संदीप शहाजी गाडे यांनी पतसंस्थेला गहाणखत म्हणून दिलेल्या क्षेत्रापैकी ४० गुंठ्ठे हे क्षेत्र किंमत २८ लाख ४० हजार रूपयांची बॅकेची कसल्याही प्रकारची परवानगी न घेता परस्पर विक्री करून फसवणूक केल्याचा प्रकार १० मार्च २०२३ पुर्वी घडला आहे.पोलीस तपासानंतर आणखीन काही फसवणुकीचे प्रकार समोर येतील काय?
या प्रकरणी बाजीराव सिताराम गव्हाणे रा.पिंपरखेड ता.आष्टी व्यवस्थापक श्री.स्वामी समर्थ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित धानोरा याच्या फिर्यादीवरून शुक्रवारी अंभोरा पोलिस ठाण्यात आरोपी लालासाहेब रंगनाथ मुठे खातेदार,तत्कालीन तलाठी बापु पांडुरंग गव्हाणे, मंडळधिकारी संभाजी नामदेव गवळी, संदिप शहाजी गाडे खातेदार, तत्कालीन तलाठी गणेश काशिनाथ गावडे यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे करीत आहेत.
प्रजापत्र | Saturday, 11/03/2023
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा