Advertisement

सव्वादोन लाखांचे मोबाईल घेवुन गेला अन परतलाच नाही

प्रजापत्र | Friday, 10/03/2023
बातमी शेअर करा

बीड - चुलत्याची ओळख सांगून आणि माझे एटीएम कार्ड येणार आहे, ते आले की मोबाईलचे बील देतो असे म्हणुन सॅमसंग फोल्ड ४ आणि ऍपल कंपनीचा आयफोन असे एकुण २ लाख ३५ हजार रूपयांचे मोबाईल उधार म्हणुन घेवुन गेला तो पुन्हा परत आलाच नाही. त्यामुळे या प्रकरणात एकाविरूध्द बीड शहर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

बीड शहर पोलीस ठाण्यात डी. पी. रोडवरील मोबाईल शॉपीचे मालक अन्सारी मोहम्मद शाहेद हिमायु कबीर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिध्दार्थ देविदास झेडे (रा. म्हसोबाची वाडी ता. इंदापुर जि. पुणे) याने २ लाख ३५ हजार रूपयांचे मोबाईल खरेदी करून बील न देता दुकानदाराची फसवणूक केल्या प्रकरणी कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पोउपनि जाधव हे करीत आहेत.

Advertisement

Advertisement