Advertisement

बीडमध्ये जुगार अड्ड्यावर धाड

प्रजापत्र | Friday, 10/03/2023
बातमी शेअर करा

बीड - सहाय्यक पोलीस अधीक्षक ( ASP ) पंकज कुमावत यांनी पथकासह शहरात भरवस्तीत सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर छापा मारुन क्लब चालक व २४ जुगाऱ्यांना ताब्यात घेत २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

 

 

ASP पंकज कुमावत यांना गुप्त खबऱ्या मार्फत बीड शहरातील माळीवेस भागात एकजण स्वतः च्या घरासमोर पत्र्याच्या शेडमध्ये पत्याचा क्लब चालवत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. माहिती मिळताच कुमावत यांनी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय केजचे पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर राजू , बालाजी दराडे, सचिन अहकारे, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल रुक्मिणी पाचपिडे, आशा चौरे, पोलीस नाईक विकास चोपणे, अनिल मंदे, दिलीप गीते, महादेव बहीरवाळ, रामहरी भंडाने, संजय टूले, दीपक जावळे, शफिक पाशा, चालक सहाय्यक फौजदार शेषराव यादव, युवराज भूबे यांना सोबत घेऊन गुरुवारी ( दि. ९ )  रोजी १०:३० वाजण्याच्या सुमारास छापा मारला असता. क्लब चालक सनी आठवले व इतर जुगारी पत्ते खेळतांना आढळून आले. पोलीसांना पहाताच जुगाऱ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीसांनी पाठलाग करत मोठ्या शिताफीने आरोपी पकडले. एकूण २४ जुगारी व क्लब चालक सनी आठवले यास ताब्यात घेतले. यांच्याकडे रोख रक्कम, जुगाराचे साहित्य तसेच इतर असा एकूण २१ लाख ३५ हजार ९७० एवढा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वैभव अनिल सारंग यांचे फिर्यादी वरून बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Advertisement

Advertisement