बीड - शहरातील पेठ बीड भागात काल रात्री उशिरा दोन गटात तुफान वाद झाल्याची घटना घडली. दोन्ही गट समोरा-समोर आल्याने झालेल्या दगडफेकीत दोघेजण जखमी झाले असुन यामध्ये सात गाड्यांची तोडफोड झाली आहे. या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत पोलिसात नोंद झालेली नव्हती. बीड शहरातील पेठ बीड हद्दीत किरकोळ कारणावरून दोन गट समोरा-समोर आल्याने मोठा वाद झाला. दोन्ही बाजूने एकमेकांच्या दिशेने दगडफेक झाली. यामध्ये दोघेजण जखमी झाले असुन या दगडफेकीत सात मोटार सायकलींचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती कळताच डीवायएसपी संतोष वाळके यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी भेट देवून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांनीही भेट देवुन परिस्थितीची माहिती घेतली. डीवायएसपी संतोष वाळके हे रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी तळ ठोकुन होते. दोन्ही गटाला त्यांनी समजुन सांगितल्याने तणाव निवळला.
बातमी शेअर करा