आष्टी-तालुक्यातील सुरडी आणि किन्ही परिसरात बिबट्याने केलेल्या शिकारीमुळे परिसर भीतीचे वातावरण पसरले असून पालकमंत्री धनंजय मुंडे हे आज (दि.२८) थोड्यावेळात किन्हीमधील ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
आज सकाळपासून बिबट्याच्या शोधार्थ औरंगाबाद,नांदेड,अमरावती आणि बीड जिल्ह्यातील वन विभागाची पथके किन्ही आणि परिसरात मोहीम राबवित असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सव्वाशे कर्मचारी कामाला लागले आहेत.पालकमंत्री धनंजय मुंडे हे किन्हीमध्ये थोड्यावेळात भेट देणार असून ग्रामस्थांशी ते संवाद साधारण असल्याची माहिती आहे.दरम्यान हा नरभक्षक बिबट्या लवकरात लवकर जेरबंद व्हावा अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
बातमी शेअर करा