बीड - होळी सणाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क बीडच्या भरारी पथकाने जिल्ह्यात विशेष तपासणी मोहिम राबवली जात आहे. या तपासणीमध्ये मांजरसुंबा येथील मामा काठियावाडी धाब्यावर एका संशयित आयशर आढळून आला. याची तपासणी केली असता यामध्ये अड्रिल क्लासीक गोवा राज्यातील महाराष्ट्रात बंदी असलेले व्हिस्कीचे ४५ बॉक्स आढळून आले.
मांजरसुंबा येथील मामा काठियावाडी धाब्यावर आयशर क्र.एम.एच.२१. एक्स. ६११३ या संशयित गाडीची तपासणी केली असता गोवा राज्यात विक्री होत असलेली व महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेली अड्रिल क्लासीक व्हिस्कीचे ७५० मिली क्षमतेचे ४५ बॉक्स आढळून आले. सदरील दारूवर महाराष्ट्रात बंदी असून चोरट्या मार्गाने ही दारू धुलिवंदनाच्या पार्श्वभुमीवर बीड जिल्ह्यात आणली जात होती. राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत एकुण १० लाख २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये डॉ.सुर्यवंशी, राज्य उत्पादन शुल्क सुनिल चव्हाण, एच. पवार, गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली आर.डब्ल्यू. कडवे, निरीक्षक पथक बीड ए.एस. नायबळ, दुय्यम निरीक्षक जवान सचिन सांगुळे, भागवत पाटील, राम गोनारे, नितिन मोरे, श्रीराम धस यांनी सहभाग नोंदवला. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास आर.डब्ल् कड़वे हे करत असून नागरीकांना कोठेही अवैध दारू विक्री होत असल्याचे आढळल्यास तात्काळ राज्य उत्पादन शुल्क यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहनही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.