Advertisement

माजलगावमधील गटबाजी एका मिनिटात संपेल, पण राज्यातल्या गटबाजीचे काय ?

प्रजापत्र | Friday, 03/03/2023
बातमी शेअर करा

माजलगाव दि. ३ (प्रतिनिधी ) : कसबा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपमधील चाण्यक्यांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह लावले जात असतानाच भाजच्या राष्ट्रीय सचिव तथा माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी केलेले विधान आता सर्वांच्या भुवया उंचावणारे ठरले आहे. माजलगाव मतदारसंघातील एका कार्यक्रमात बोलताना ' माजलगाव मतदार संघातील भाजपमधील गटबाजी एका मिनिटात संपून टाकु शकते परंतु महाराष्ट्रातील गटबाजीचं काय ?'  असे म्हणत पंकजा मुंडे यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे.

 

 माजीमंत्री पंकजा मुंडे ह्या माजलगाव शहरात  एका खाजगी कार्यक्रमाला आल्या होत्या. माजी सभापती नितीन नाईक नवरे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे यांना विचारलेला प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना निश्चितच बळ देण्यात येणार आहे.असे असले तरी माजलगाव मतदार संघातील पक्षांतर्गत गटबाजी मी एकाच मिनिटात संपवू शकते असे म्हणत मी आक्रमण म्हटल्यास सर्व एक दिलाने काम करतील.राज्यामध्ये पक्षांतर्गत गटबाजी असताना बीड जिल्ह्याच्या स्थानिक गटबाजीवर काय भाष्य करू?असे म्हणत यापुढे सर्व एकदिलाने काम करताना दिसतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

 यावेळी माजी आ.आर.टी. देशमुख , माजलगाव मतदार संघाचे भाजप नेते रमेश आडसकर, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहन जगताप, माजी सभापती नितीन नाईकनवरे यांची एकत्रित उपस्थिती यावेळी या ठिकाणी दिसून आली.पंकजा मुंडे यांच्या दौऱ्यानिमित्त एकत्र आलेल्या सर्व भाजपाचे दिग्गज नेते भविष्यात एकत्रित निवडणुकीत काम करतील का ? असा प्रश्न यावेळी कार्यकर्त्यांसमोर पडला. नाईकनवरे यांच्या निवासस्थाना बरोबर रमेश आडसकर,मोहन जगताप यांच्या निवासस्थानी स्वतंत्र भेटी दिल्या व त्यांच्या वैयक्तिक प्रश्नावर सविस्तर चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

Advertisement