मुंबई दि.2 (प्रतिनिधी):
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत राबविल्या जाणार्या फिजिओथेरपी सह इतर काही पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता या अभ्यासक्रमांसाठी आता 10 मार्चपर्यंत प्रवेश घेता येणार आहेत. विशेष म्हणजे राज्य सामायिक प्रवेश परिक्षा कक्षामार्फत हे प्रवेश होणार असल्याने या कक्षाकडे रिक्त असलेल्या जागांवर नोंदणी करण्यासाठी देखील ही मुदतवाढ देण्यात आली असून ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी सीईटी सेलकडे नोंदणी केलेली नाही त्यांना आता नव्याने नोंदणी करता येणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसचिव अजीत सासूरकर यांनी हे आदेश काढले आहेत. यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या फिजिओथेरपी व इतर अभ्यासक्रमांसाठी प्रवेशासाठी आणखी एक संधी मिळाली आहे.
बातमी शेअर करा