बीड - शहरातील खासबाग परिसरातील फ्रुट मार्केटच्या परिसरातील मैदानावर खेळण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलाला धमकावून त्याच्याकडील अॅप्पल कंपनीचा मोबाईल हिसकावून घेत चोरटा त्याठिकाणाहून विनानंबरच्या दुचाकीवरुन पसार झाला. याप्रकरणी बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल होताच अवघ्या २४ तासाच्या आता त्या चोरट्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार शहरातील सोमेश्वर नगरमधील ज्ञानदिप बालासाहेब तोंडे (वय १५) हा मुलगा आपल्या मित्रांसह खासबागममधील फ्रुट मार्केट जवळ असलेल्या मैदानावर सोमवारी खेळण्यासाठी गेला होता. दरम्यान त्याठिकाणी एक चोरटा आला, त्याने ज्ञानदिपला चापट मारण्याची भिती दाखवून त्याच्याकडील अॅप्पल कंपनीचा आयफोन सेवन मोबाईल बळजबरीने हिसाकावून
घेवून विना नंबरच्या दुचाकीवरून पसार झाला. याप्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात ज्ञानदिप तोंडे याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल होताच ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवि सानप यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोशि सय्यद अश्पाक, पोशि. मनोज परजणे, पोशि सुशेन पवार, पोशि अविनाश सानप यांनी या घटनेचा शोध घेत अवघ्या २४ तासाच्या आत त्या मोबाईल चोराला गजाआड केले. याप्रकरणाचा पुढील तपसा एएसआय बाळासाहेब सिरसाट करत असून मागील काही महिन्यांपासून बीड शहर पोलिस ठाण्याचे रवि सानप यांनी ठाण्यातंर्गत आपली यंत्रणा सर्तक केली आहे. यामुळं बीड शहरातील चोरींच्या घडणाऱ्या घटनांचे प्रमाण घटले असून कर्तव्यदक्ष सिंघम अधिकारी रवि सानप यांच्यासह शहर पोलिसांचे नागरिकांमधुन कौतुक केले जात आहे.