Advertisement

तेलगाव कारखान्याच्या भुसाबेल्टला आग

प्रजापत्र | Saturday, 25/02/2023
बातमी शेअर करा

माजलगाव :- तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या भुसा बेल्टला आज दुपारी 5.30 च्या दरम्यान आग लागली.यात येथील बेल्ट जळून खाक झाला त्यामुळे कारखाना सध्या काही वेळा पुरता बंद ठेवण्यात आला आहे आग लवकर आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. 
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार,आग लागल्यानंतर जोरदार वाऱ्यामुळे ती पसरली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, वाऱ्यामुळे यामध्ये अडथळे येत होते.अग्निशमन दलाच्या गाड्यांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली व मोठा अनर्थ टळला

 

Advertisement

Advertisement