Advertisement

माजलगावच्या ग्रामसेवकाला मागीतली दहा लाखाची खंडणी

प्रजापत्र | Saturday, 25/02/2023
बातमी शेअर करा

माजलगाव - तालुक्यातील एका ग्रामसेवकांना तुम्ही विकास कामात भ्रष्ट्राचार केला आहे, असे धमकावत दहा लाख रुपयांची मागणी केली. या प्रकरणी ग्रामसेवकांनी दिलेल्या तक्रारीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कुंडलिक रघुनाथ खेत्री यांच्या विरुध्द खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हंटले आहे की, आनंदकुमार तानाजी सिरसट (वय ३५) रा.विवेकानंद नगर, माजलगाव येथील रहिवाशी असून माजलगाव पंचायत समिती येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. तसेच ऑगस्ट २०१७ ते डिसेंबर २०२२ या दरम्यान मोठेवाडी ग्रामपंचायतला ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. २०२२ मध्ये कुंडलिक रघुनाथ खेत्री यांनी तुम्ही ग्रामपंचायत मध्ये राबवलेल्या योजनांची माहिती द्या, दोन दिवसात ग्रामसभा लावा असे खेत्री म्हणाले. यावर मी सर्व कागदपत्रे तुम्हाला देतो असे सांगितले. त्यावर ही त्यांनी माहिती अधिकारातून माहिती विचारलेली कामे झालेली असून ती कामे होणाऱ्या कामाविषयी आहे असे सागितले. पुढे कुंडलिक खेत्री यांनी मला फोन करून तुम्ही ग्रामपंचायतच्या कामामध्ये भ्रष्ट्राचार केला आहे. माझी लवकरात लवकर भेट घ्या, नाही तर मी तुमच्या नावे तक्रार अर्ज देवून तुमची चौकशी लावील असे म्हणून मला परेशान करू लागले. त्यानंतर काही दिवसांनी मोठेवाडीचे तत्कालीन सरपंच अविनाश विश्वनाथ गोडे यांच्या बाजार रोड माजलगाव येथील घरी कुंडलीक रघुनाथ खेत्री यांची भेट झाली होती. तेथेही त्यांनी मी तुम्ही केलेल्या भ्रष्टाचाराची अर्ज देवून चौकशी लावुन बदनामी करणार आहे, तसे होवु द्यायचे नसेल तर तुम्ही मला वीस लाख रुपये द्या, असे म्हणाले असता मी त्यांना आम्ही कायदेशीर कामे केलेली आहेत, कुठलाही प्रष्टाचार केलेला नाही असे सांगीतले. त्यानंतर त्यांनी माझ्याविरुध्द तक्रारी अर्ज तयार करून माझे व्हाट्सअप क्रमांक 8793521754 यावर पाठवून पैशाची मागणी केली होती. त्यावरही मी त्यांना काहीही बोललो नाही. त्यानंतर दि.12 डिसेंबर 2022 रोजी दुपारी ११.३० वा. सुमारास मी बायपास रोड येथील माऊशीचे हॉटेलवर असतांना कुंडलीक रघुनाथ खेत्री हे मला भेटले. त्यांनी मला तुम्ही मला तीन दिवसात वीस लाख रुपये द्या, वीस लाख रुपये देणे होत नसतील तर दहा लाख रुपये द्या. नाहीतर मी तुमच्याविरुध्द तक्रारी अर्ज देणार आहे असे म्हणुन मला पैशाची मागणी केली. तसेच माझी बदनामी करण्याची धमकी दिली. त्यावेळी मी त्याचा माझ्या मोबाईलमध्ये व्हीडीओ रेकॉर्ड केला आहे.

या प्रकरणी आज दि.२५ शनिवारी ग्रामसेवक आनंदकुमार तानाजी सिरसट यांच्या फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलिस ठाण्यात माझ्याविरुद खोटा अर्ज तयार करून तो प्रसार माध्यमांना देवून माझी बदनामी केल्या प्रकरणी  कुंडलीक रघुनाथ खेत्री रा.मोठेवाडी ता. माजलगाव याचेविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement