माजलगांव - (निलेश गरुड) शहरातील राष्ट्रीय महामार्ग-61वर असलेल्या मार्केट कमिटी नवीन मोंढा समोर स्पीड ब्रेकर वर मोटार सायकलचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या ट्रक वर मोटारसायकलची धडक होऊन एक तरुण जागीच ठार झाला 21 फेब्रुवारी रोजी रात्री 12 च्या सुमारास झालेल्या अपघातात माजलगांव शहरातील राष्ट्रीय महामार्ग-61वर असलेल्या मार्केट कमिटी नवीन मोंढा समोर तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
या अपघाता प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार
घनसावंगी तालुक्यातील शिंदे वडगाव येथील शेख सलीम शेख अलीम वय वर्ष 33 हा तरुण माजलगाव येथे लग्न समारंभा साठी मोटारसायकल क्रं.एम.एच.21-BW 8186 वरुन प्रवास करत मंगळवार 21 फेब्रुवारी रोजीच्या सायंकाळी 12 वा.परत गावाकडे निघत होता. तो शहरातील राष्ट्रीय महामार्ग-61वर असलेल्या मार्केट कमिटी नवीन मोंढा समोर आला असता स्पीड ब्रेकर न दिसल्याने मोटारसायकलचा ताबा सुटला व समोरून भरधाव येणाऱ्या ट्रक क्रं.एम.एच.-19/Z -1921च्या समोर आला त्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान अपघात स्थळी माजलगांव शहर पोलीस ठाण्याचे सपोनि.संदीप मोरे व अमोल कदम यांनी भेट देऊन ट्रक पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.