माजलगाव:- तालुक्यातील गुंजथडी येथील २० वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रविवार सायंकाळी 7 च्या दरम्यान घडली. तालुक्यातील गुंजथडी येथील विष्णू शहाणे यांच्याशी जयश्री हीचा सहा महिन्यापूर्वी विवाह झाला होता. अचानक जयश्री विष्णू शहाणे (वय २०) हिने राहत्या घराच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दि.१९ रोजी ७ वाजण्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल हे करत आहेत.
बातमी शेअर करा