कडा - कडा येथील बाजार समितीमध्ये बुधवारी कांद्याचा लिलाव असल्याने खिळद येथील शेतकरी दुचाकीवर येत असताना पैठण बारामती रोडने भरधाव वेगात येत असलेल्या मालवाहतुक ट्रकने जोराची धडक दिली.यात दुचाकीवरील दोघाचा जागीच मुत्यु झाल्याची घटना घडली आहे. बाबासाहेब गर्जे वय ४५, नारायण गोल्हार वय ४३ असे मयतांची नावे आहेत.
आष्टी तालुक्यातील कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी कांद्याचा लिलाव असल्याने या लिलावासाठी खिळद येथील शेतकरी बाबासाहेब गर्जे व नारायण गोल्हार हे दुचाकी क्रमांक M.H.16, B.F.9573 येत असताना पैठण बरामती रोडने लोंखडाने भरलेला ट्रक क्रमांक M.H.12, E.F. 3646 याने पाठीमागून जोरांची धडक दिल्याने दोघांचा जागीच मुत्यु झाला. ही घटना बुधवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर घडली.
बातमी शेअर करा