Advertisement

बिबटयाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यु

प्रजापत्र | Tuesday, 24/11/2020
बातमी शेअर करा

आष्टी-तालुक्यातील सुरडी पंचायत समिती गणाचे सदस्य आशा गर्जे यांचे पती नागनाथ गर्जे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी (दि.२४) सायंकाळी समोर आली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
                नागनाथ गर्जे हे मंगळवारी दुपारी आपल्या शेतात कामासाठी गेले असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करत त्यांना ठार मारले.यावेळी बिबट्याने त्यांचे धड शिरावेगळे केल्याची माहिती आहे.बिबट्याने हल्ला चढविल्यानंतर गर्जे हे मोठ्या ओरडले होते,मात्र परिसरातील नागरिकांनी याकडे फारसे गांभीर्याने घेतली नाही असे सांगण्यात येते.सायंकाळ झाल्यानंतरही ते आपल्या घरी न आल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी काही जण त्यांच्या शेतात गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.ग्रामस्थांच्या वारंवारच्या तक्रारीनंतरही बिबटयाला जेरबंद करण्यात वनविभाग अपयशी ठरल्याने शेतकऱ्यांच्या जिवावर बेतत आहे.
दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली असून त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे. 

Advertisement

Advertisement