Advertisement

छत्तीस लाखाचा गुटखा पकडला

प्रजापत्र | Saturday, 04/02/2023
बातमी शेअर करा

नेकनूर - दि 04 अशोक शिंदे

  सहाय्यक पोलीस अधीक्षक  पंकज कुमावत यांनी गुटख्यावर मोठया प्रमाणात कारवाईचे बडगा उगारला असल्याने अवैध धंदे चालकाचे धाबे दणाणले असल्याचे चित्र दिसून येत असतानाच आज पुन्ह पहाटे सोलापूर ते बीड रोडवर गुटख्याची ट्रक ताब्यात घेऊन त्यांच्या वर नेक नुर पोलीस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार ट्रक क्र जीजे 12 ए वाय 9425 यामध्ये गोवा गुटख्याचा माल बसवकल्याण येथे भरून तो सोलापूर ते बीड रोड ने मांजरसुंबा मार्गे बीड येथे जात आहे अशी माहिती मिळाल्यावर पहाटे सोलापूर , बीड  रोडवर उदंड वडगाव येथे रोडवर ट्रक थांबून सदर ट्रक चालक यांना ताब्यात घेतले.  ट्रकची पाहणी केली असता ट्रकमध्ये गोवा गुटख्याचे 40 मोठे बोध प्रत्येक बोधा मध्ये चार पोते असे एकूण 160 होते किमती 36 लाख रुपये ट्रक किंमत पंधरा लाख रुपये  दोन मोबाईल 20000 रु असा एकूण किमती 51 लाख वीस हजार रुपयाचा माल ताब्यात घेऊन पोलीस ठाणे नेकनूर येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल बालाजी दराडे यांच्या फिर्याद वरून ट्रक चालक वजीर इम्रान गुल मोहम्मद , सोबत असणारा किन्नर समीर सुलेमान नोतियार यांना ताब्यात घेऊन नेकनूर ठाण्यात गुन्हा दाखल आहे.  सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे बाबासाहेब बांगर, राजू वंजारे, विकास चोपणे, संजय टुले, दिलीप गीते, अनिल मंदे ,सचिन अहकारे, यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement