माजलगाव- माजलगाव तालुक्यातील गोविंदवाडी (रामनगर)येथे अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून 54 हजाराचे दागिने लंपास केले.26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी दुपारच्या दरम्यान घडली. आठवड्याभरात सतत होणाऱ्या चोऱ्यांच्या सत्रामुळे नागरिक भयभीत आहे. माजलगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात चोरट्यांनी धुमाकूळ घालण्याच्या घटना सुरूच आहेत. गत आठवड्या भरापूर्वीच सादोळा, छत्रबोरगाव,पायतळवाडी यासह अनेक ठिकाणी भुरट्या चोऱ्या झाल्या होत्या.26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी गोविंदवाडीत येथील (रामनगर) येथे सूर्यकांत जनार्दन मुंडे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला.यावेळी चोरट्यांनी घरातील ज्वारीच्या पोत्यात,डब्यात,ठेवण्यात आलेले सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. ज्याची अंदाजे किंमत 54 हजार रुपये आहे.ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.ग्रामीण भागातील चोऱ्यांचे सत्र थांबत नसल्याने नागरिक भयभीत आहे. दरम्यान पोलिसांबाबत नागरिकांमधून रोष व्यक्त आहे.
बातमी शेअर करा