Advertisement

सहा लाखांची वाटमारी झाल्याचा बनाव उघड फिर्यादीच निघाला आरोपी

प्रजापत्र | Tuesday, 10/01/2023
बातमी शेअर करा

कडा - येथील एका दुकानात काम करत असलेल्या तरूणांने धामणगांव कडा रोडवर अनोळखी लोकांनी चाकुचा धाक दाखवून सहा लाख रूपयाची बॅग पळवल्याचा बनाव उघडकीस आला असुन चक्क फिर्यादीच आरोपी निघाला असून वर्गमित्रांच्या मदतीने त्याने कांड केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आष्टी तालुक्यातील चोभानिमगांव येथील आदेश गौतम बोखारे हा कडा येथील राहुल पटवा याच्या दुकानात कामाला होता. दररोज तो व्यवहारांचे पैसे गोळा करून दुकानात आणायचा. नेहमी प्रमाणे तो ११ जुलै २०२२ रोजी परिसरातील उधारीचे पैसे गोळा करून धामणगांव येथे आला.तिथुन पैठण बारामती रोडने कड्याकडे दुचाकीवरून निघाला असता. याच रोडवरील गितेवाडी शिवारात अनोळखी लोकांनी गाडी आडवत चाकुचा धाक दाखवून बॅगमधील सहा लाख रूपये घेऊन गेल्याचा बनवा केला. अंभोरा पोलिस ठाण्यात आदेश बोखारे च्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत सत्य शोधण्याचा प्रयत्न केला पण मागमूस लागत नव्हता. ९ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने आदेश गौतम बोखारे वय २२ रा.चोभानिमगांव, महेश त्रिंबक करडुळे वय २३ रा. धिर्डी यांना सापळा लावून ताब्यात घेतल्यावर पोपटासारखे बोलुन वर्गमित्रांच्या मदतीने पैसे चोरीला गेल्याचा व चाकु लावल्याचा बनाव केल्याचे उघड केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ, पोलिस उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, अंमलदार प्रसाद कदम यांनी केली. सदरील आरोपीला अंभोरा पोलिसाच्या ताब्यात दिले असून अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे याच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ भडके करित आहेत.

Advertisement

Advertisement