Advertisement

औरंगाबादच्या पाणचक्कीसह नहर-ए- अंबरची राष्ट्रीय वॉटर हेरिटेज स्थळांच्या यादीत नोंद

प्रजापत्र | Saturday, 07/01/2023
बातमी शेअर करा

ऐतिहासिक स्थळांचं (Historical Site) शहर म्हणून ओळख असलेल्या औरंगाबादच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. कारण देशभरातील वॉटर हेरिटेज स्थळांची घोषणा शुक्रवारी केंद्र सरकराने केली असून, ज्यात औरंगाबाद शहरातील 400 वर्षे जुन्या नहर-ए-अंबरीची (Nahar-E-Ambari) आणि नहर-ए-पाणचक्कीची (Panchakki) नोंद करण्यात आली आहे. देशभरातील 75 जलसाठ्यांमध्ये या दोन नहरींचा समावेश करण्यात आला असल्याने औरंगाबादची आणखी एक नवीन ओळख राष्ट्रीय पातळीवर नोंदवली गेली आहे. 

अजिंठा-वेरूळ लेणी, बीबी का मकबरा आणि वेगवेगळ्या ऐतिहासिक स्थळ आणि धार्मिक स्थळांमुळे औरंगाबादची ओळख देशभरासह जगाच्या नकाशावर आहे. त्यामुळे देशातील वेगेवेगळ्या राज्यातील पर्यटकांसह विदेशी पर्यटक देखील रोज औरंगाबादला भेट देत असतात. अशातच आता औरंगाबादच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील 400 वर्षे जुन्या नहर-ए-अंबरी, नहर-ए-पाणचक्कीची केंद्र सरकारच्या जलशक्ती मिशन मंत्रालयाने नोंद घेतली आहे. देशभरातील 75 जलसाठ्यांमध्ये या दोन नहरींचा समावेश करण्यात आला आहे.  

2021 मध्ये तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी औरंगाबादेतील नहरींचा केंद्र शासनाने जलशक्ती मिशनमध्ये समावेश करावा, यासाठी पाठपुरावा केला होता. तर विद्यमान प्रशासक डॉ. अभिजित चौधरी आणि त्यांची टीमने यासाठी केंद्राकडे विविध माहिती सादर केली होती. त्यामुळे अखेर जलशक्ती मिशन मंत्रालयाने वॉटर हेरिटेज स्थळांमध्ये या दोन्ही नहरींचा समावेश केला आहे. 
मलिक अंबर यांनी 17 व्या शतकात म्हणजेच 1662 मध्ये आपल्या आधिपत्याखालील औरंगाबाद शहरातील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी मसायफनफ पद्धतीचा वापर करून मनहर-ए-अंबरीफनावाची पाणीपुरवठा योजना आखली होती. विशेष म्हणजे त्या काळात कोणत्याही तंत्रज्ञानाची जोड नसताना शहरातील खाम नदीच्या उगमस्थानी प्रथम पाणी अडविण्यासाठी तलाव बांधण्यात आला. याच तलावातील साठवलेले पाणी सुमारे चार मैल अंतरावरील ऐतिहासिक मकबरा वास्तूपर्यंत आणण्यासाठी नहरी म्हणजेच कालव्याचा मार्ग खोदून ते पाणचक्कीपर्यंत आणले गेले. मात्र पुढे या सर्वांची देखभाल न झाल्याने ही यंत्रणा कोलमडली. 

पाणचक्कीवर दळले जायचे दळण  

औरंगाबाद शहरातील पाणचक्की हे एक ऐतिहासिक स्थळ आहे. आजही शेकडो पर्यटक या ठिकाणी रोज भेट देतात. पाण्याच्या प्रवाहातील उर्जा वापरुन चालणारे यंत्र आणि याच यंत्रावर पीठ दळण्याचे काम व्हायचे. जलप्रपातातून तयार होणाऱ्या पाण्याच्या दाबाचा वापर करून त्यातून उर्जा निर्माण केली जायची. त्याच ऊर्जेच्या आधारावरती दगडी जाते फिरते ठेवणे आणि त्यावर दळण दळले जात होते.  शाह नावाचे  एक सुफी संत ह्या पाणचक्कीवर पीठ तयार करायचे असेही सांगितले जाते. 
 

Advertisement

Advertisement