Advertisement

बीडची अवस्था ‘असुनी नाथ मी अनाथ’

प्रजापत्र | Thursday, 05/01/2023
बातमी शेअर करा

बीड-बीड जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी सहकारमंत्री अतुल सावे यांच्यावर सोपविण्यात आलेली असली तरी त्यांना पक्षांतर्गत ‘झोनबंदी ’चे पालन कटाक्षाने करावे लागत आहे. त्यामुळे अनेक  होताना दिसत नाही. परिणामी बीड जिल्ह्याची अवस्था ‘असुनी नाथ , मी अनाथ ’ अशी झाल्याचे चित्र आहे.
बीड जिल्ह्याच्या मागच्या कित्येक वर्षाच्या इतिहासात बीडला सध्या मोठ्या राजकीय असहायतेला सामोरे जावे लागत आहे. शिंदे- फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर उशिरा का होईना, बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अतुल सावे  अतुल सावे अधून मधून बीडला येतातही. मात्र सावे यांच्या जिल्ह्यातील वावरावर अनेक बंधने असल्याचेच चित्र राजकीय जाणकारांना दिसत आहे. अतुल सावे यांनी जिल्ह्याच्या दौर्‍यात कोणाला भेटायचे, कोणती कामे करायची याबाबाबत त्यांना कटाक्षाने सांगितले जाते , आणि त्यापलीकडे सावे यांना जात येत नाही अशीच परिस्थिती असल्याचे चित्र आहे. बीड जिल्ह्यात भाजपचे विधानसभेत 2 आमदार आहेत , तर विधानपरिषदेवर 1 सदस्य आहेत. माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा जिल्हा अशी बीडची ओळख आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या हद्दीत तरी पंकजा मुंडेंना विचारल्याशिवाय काही करायला नको अशी सावध भूमिका सध्या अतुल सवानीं घेतल्याचे चित्र आहे.
पक्षाच्या पातळीवरची ही ‘झोनबंदी ’ अतुल सावे यानांच्यासाठी सोयीची असली तरी यामुळे जिल्ह्याच्या विकासाला मात्र खीळ बसली आहे. नियोजन समितीच्या निधीचा खर्च करण्याचा विषय असेल किंवा प्रशासनावरील नियंत्रणाचा, भाजपच्या वेगगवेग्ळ्या पदाधिकार्‍यांची वेगवेगळी मते , पंकजा मुंडेंच्या वेगळ्या भूमिका, खा. प्रीतम मुंडे यांची वेगळी मते, यातून अनेक विषयावरचे निर्णयच व्हायला तयार नाहीत. त्यातूनच आता भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना देखील अशा अवस्थेचा त्रास होत असल्याचे चित्र आहे. बीड जिल्ह्याची अवस्था ‘असुनी नाथ, मी अनाथ’ झाल्याचे लोक बोलत आहेत.

 

प्रथमच राजकारणाच्या परिघाबाहेर
मागच्या 3 दशकात बीड जिल्हा कायम राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला होता. सत्तरच्या दशकात सुंदरराव सोळंके, केशरकाकू क्षीरसागर, शिवाजीराव पंडित, बाबुराव आडसकर असे प्रभावी नेते होते. नंतर ९० च्या दशकापासून गोपीनाथ मुंडे यांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याकडे पहिले जाऊ लागले. स्वतः गोपीनाथ मुंडे,जयदत्त क्षीरसागर, विनायक मेटे  आदी नेत्यांमुळे बीडची वेगळी ओळख होती. मात्र आता गोपीनाथ मुंडे, विनायक मेटे हयात नाहीत, जयदत्त क्षीरसागर यांचा विधानसभेत पराभव झाला, पंकजा मुंडेही पराभूत झाल्या, धनंजय मुंडे आमदार असले तरी विरोधी पक्षातले आहेत. त्यामुळे मागच्या कित्येक वर्षानंतर प्रथमच  बीड जिल्हा राजकीय पाटलाच्या परिघाबाहेर गेल्याचे चित्र आहे.

Advertisement

Advertisement