Advertisement

बीड शहरातील ३२ पानटपरी धारकांवर कारवाई

प्रजापत्र | Friday, 23/12/2022
बातमी शेअर करा

 बीड दि.२३ (प्रतिनिधी) - शहरातील विविध भागांमध्ये ३२ पानटपरीधारकांवर कारवाई करून १० हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला .सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने, जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादण पुरवठा आणि वितरण विनिमय अधिनियम नुसार ही कार्यवाही (दि.२२) रोजी  करण्यात आली.

 

जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या आदेशान्वये (दि.२२) रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमारठाकूर ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे ,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते , अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुलदीप शहाणे , निवासी वैद्यकीय अधिकारी अव्हाइ यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहरातील मुख्य तेलगाव नाका,बार्शी रोड ते मांजरसुंबा परिसरात ३२ पानठेल्यावर कार्यवाही करत १० हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने, जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादण पुरवठा आणि वितरण विनिमय अधिनियम २नुसार ही कार्यवाही करण्यात आली.ही कार्यवाही जिल्हा स्तरीय तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकामार्फत अधिकारी प्रेमचंद साळवे HC शरद पवार HC dr सुमय्या सय्यद जिल्हा सल्लागार राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, समुपदेशक  नागनाथ भडकुंबे व सामाजिक कार्यकर्ता  सुरेश दामोदर या टीमनी संयुक्तरितिने कार्यवाही केली.
 

Advertisement

Advertisement