परळी - छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन गटात तुफान राडा झाल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांच्यावर यावेळी जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आलीय. राजाभाऊ फड हे रासप नेते आणि विधान परिषदेचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावाई आहेत.
परळीच्या शिवाजी चौकात संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी रासपचे युवक प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांच्या गाडीवरही हल्ला झालाय. तसेच त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या.
बातमी शेअर करा