Advertisement

७ लांखाचा गांजा जप्त

प्रजापत्र | Saturday, 10/12/2022
बातमी शेअर करा

प्रविण पोकळे 

आष्टी (प्रतिनिधी) - बीड कडा नगर राष्ट्रीय महामार्गापासून आठ किलोमीटर अंतरावर कपासी लावलेल्या शेतात १०० गांजाची झाडांची लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा बीड व अंभोरा पोलिसांनी संयुक्त कारवाई करून ७० किलो गांजा पकडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास बाळेवाडी येथे घडली.

    आष्टी तालुक्यातील बाळेवाडी येथील हनुमंत अर्जुन पठारे याने स्वताच्या शेतात कपाशी लावली होती.त्या पिकात गांजाची झाडे लावल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा बीड व अंभोरा पोलिसांना समजाताच त्यानी संयुक्त कारवाई करत कपाशी शेतात गांजाच्या १०० झाडे लावल्याचे निदर्शनास आले.त्याचे एकुण ७० किलो वजन होते. अंभोरा पोलिस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे याच्या फिर्यादीवरून आरोपी हनुमंत अर्जुन पठारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत ,अंभोरा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवि देशमाने, एएसआय वचिष्ठ कांगणे,पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबुराव तांदळे,शिवदास केदार, प्रसाद कदम, सोमनाथ गायकवाड, रामदास तांदळे, विकास वाघमारे,अतुल हराळ,अशोक कदम,यानी केली. आरोपी पसार असून पुढील तपास अंभोरा पोलिस करीत आहेत.

Advertisement

Advertisement