Advertisement

LIC मधील तुमचे पैसे, आता थेट मागवा बँकेच्या खात्यात

प्रजापत्र | Sunday, 15/11/2020
बातमी शेअर करा

मुंबई :देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीने लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC)ने ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आणली आहे. तुम्ही जर LIC चा विमा घेतला असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.अनेकदा असं होतं की, ग्राहक आपल्या नावावर किंवा कुटुंबाच्या नावावर एलआयसी पॉलिसी उघडतात. पण काही काळानंतर पॉलिसीमध्ये पैसे भरण्यास आपण असमर्थ होतो.यावेळी पॉलिसीचा प्रीमियम एलआयसीकडे जमा होतो. अशात पॉलिसीधारकाच्या अचानक निधनानंतर, नातेवाईक पॉलिसीबद्दल फारशी चौकशी करत नाहीत आणि त्यामुळे मोठं नुकसान होतं.पण आता तुम्हाला तुमची हक्काची रक्कमकडून घेता येणार आहे. जाणून घेऊयात काय आहे याची प्रक्रिया. 
                   एलआयसी आपल्या ग्राहकांना अनेक सुविधा पुरवत असते. त्यामुळे एलआयसीने ग्राहकांना त्यांचे पैसे परत मिळवण्याचीही सुविधा सुरू केली आहे. एलआयसीच्या वेबसाइटवरून ग्राहकांना त्यांच्या हक्काच्या रकमेबद्दल माहिती मिळू शकेल.यासाठी पॉलिसी क्रमांक, पॉलिसीधारकाचं नाव, जन्म तारीख आणि पॅनकार्ड क्रमांकाची माहिती द्यावी लागेल.पॉलिसी क्रमांक आणि पॅनकार्ड क्रमांक पर्यायी आहेत.पॉलिसीधारकाचे नाव आणि जन्मतारखेची माहिती देणं महत्वाचं आहे, त्याशिवाय तुम्ही पैसे मिळवू शकत नाही.सगळ्यात आधी एलआयसी वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर जा. यानंतर पृष्ठाच्या तळाशी Unclaimed Amounts of Policyholders वर क्लिक करा.क्लिक केल्यानंतर आपण एक नवीन पृष्ठ उघडेल. जिथे तुम्ही माहिती भरुन तपास करू शकता.
तुमच्या पॉलिसीमध्ये रक्कम असल्यास तुम्ही थेट एलआयसीशी संपर्क साधू शकता आणि त्या रकमेसाठी अर्ज करू शकता.यानंतर यासाठी एक फॉर्म भरून केवायसी पूर्ण करून घ्या. 

 

Advertisement

Advertisement