परळी-कोरोनाच्या संशयित रुग्णाचा स्वॅब घेण्यासाठी अंबाजोगाई येथे रुग्णाला पाठवावे लागत होते. त्यानंतर हे स्वॅब औरंगाबाद किंवा लातुर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी जात होते.यामध्ये तपासणीचा अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत होता.परंतु आता परळी उपजिल्हा रुग्णालयातच स्वॅब घेण्यासाठीची यंञणा उभारली असून काल पहिल्यांदाच दोन संशयीत रुग्णाचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.कोरोनाच्या संदर्भात आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे असे प्रभारी वैद्यकिय अधिक्षक डॉ.दिनेश कुरमे यांनी सांगितले.
शासनाने बाहेरून येणाऱ्यांना परवानगी दिल्याने आलेल्या नागरीकांच्या तपासण्या करणे गरजेचे बनले आहे. कोरोनाला पसरू न देण्यासाठी शासन युध्दपातळीवर उपाययोजना राबवत आहे. यापूर्वी उभारण्यात आलेली राज्यातील यंत्रणा कमी पडत असून, त्यांच्यावर प्रचंड ताणही येत आहे.ही बाब लक्षात घेता ठिकठिकाणी स्वब नमुने घेण्यासाठी यंत्रणा उभ्या केल्या जात आहेत. शुक्रवारी परळीच्या उपजिल्हा रूग्णालयात कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यास सुरूवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी दोघांचे नमुने घेवून ते प्रयोगशाळेला तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिनेश कुरळे, डॉ.अर्शद शेख, डॉ.गायकवाड, डॉ.दुबे, डॉ.आस्मा शेख, डॉ.मोरे, डॉ.माने यांच्यासह जेष्ठ परिचारीका श्रीमती मगरे, श्रीमती कुलकर्णी, श्रीमती महामुनी, लॅब टेक्निशियन सर्व यांच्या मार्गदर्शनात हे स्वॅब नमुने घेण्यास सुरूवात करण्यात आली.
प्रजापत्र | Friday, 29/05/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
Leave a comment