अशोक शिंदे
नेकनूर दि.१८-दिवंगत विमल मुंदडा यांच्या प्रयत्नाने बीड जिल्ह्यात नेकनूर येथे सर्वात मोठे ६० बेडचे अद्यावत स्त्री रुग्णालय उभारल्याने नेकनूरसह परिसरातील ६० ते ७० गावातली महिलांची सोय झाली.येथे महिलांना चांगल्या प्रमाणात आरोग्यसेवा मिळते परंतु मागील काही दिवसांपासून येथे ऑपरेशन थिएटरमध्ये प्रस्तुतीसाठी अडचणी येऊन महिलांनी गैरसोय होत असल्याने अनेक वेळा रुग्ण रेफर करण्याची वेळ येत होती परंतु आता येथे अद्ययावत 'मॉड्युलर ऑपरेशन थिएटर' झाल्याने प्रस्तुतीसाठी आणि अन्य ऑपरेशन साठी येथे उत्तम सोय झाली आहे.
बीड जिल्ह्यातील अनेक शासकीय रूग्णालये आपला चेहरामोहरा बदलत आहेत. त्यापैकीच नेकनुर एक आहे. या रूग्णालयात अत्याधुनिक सुविधा, स्वच्छता, शिस्त दिसून येत आसूण याच संकल्पनेतून नेकनूर च्या स्त्री रुग्णालयाचा कायापालट होऊन सुसज्ज आणि देखणे असे रुग्णालय बनले असून कोरोना काळातही येथील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी उत्तम सेवा दिल्याने जिल्ह्यात येथील रुग्णालयाची सेवा आदर्श ठरत आहे. बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी बीड जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश मिळाले आणि नेकनूर रूग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला.
आ.नमिता मुंदडा यांचा पाठपुरावा
नेकनूर येथील रुग्णालय असो की अन्य कुठलाही प्रश्न या प्रश्नांसाठी केज मतदार संघाचे आ.नमिता मुंदडा यांचा नेहमीच पाठपुरावा सुरू असतो, नेकनूरच्या स्त्री व कुटील रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार करून पाठपुरावा केल्याने येथे उत्तम ऑपरेशन थिएटर बनले आहे.
रुग्णांची उत्तम सोय झाली...
नेकनूर येथील रुग्णालयात उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी , कुठल्याच रुग्णांची गैरसोय होणार नाही यासाठी नेहमीच माझा प्रयत्न सुरू असतो , येथे स्त्री रोगतज्ञ यांच्या सह , डॉक्टर , नर्स , कर्मचारी सर्व स्टाफ चांगल्या प्रकारे कामं करत आहेत, मागील काही दिवसांपासून येथील ऑपरेशन थिएटरचे काम सुरू असल्याने येथे सिजर किंवा अन्य ऑपरेशन सूरू नव्हते परंतू आता येथे उत्तम असे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर झाल्याने प्रस्तुतीसाठी आणि ऑपरेशनसाठी उत्तम सोय झाली आहे.
(डॉ.अशिलाक शिंदे,वैद्यकीय अधीक्षक स्त्री व कुटीर रूग्णालय नेकनूर)