Advertisement

बीड शहराला जाणवला गुढ आवाज

प्रजापत्र | Tuesday, 01/11/2022
बातमी शेअर करा

बीड दि.१ (प्रतिनिधी) - शहरासह परिसरामध्ये सातत्याने गुढ आवाज होत आहेत. हे आवाज नेमके कशाचे होतात? याचा शोध अद्यापही भुगर्भ तज्ञांना लागलेला नाही. आज दुपारी 12.30 वाजण्याच्या दरम्यान अनेकांना गुढ आवाज जाणवला आहे.

 

बीडसह परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून गुढ आवाज होत आहे. या गुढ आवाजाचे गुढ अद्याप उकललेले नाही. गेल्या काही महिन्यापूर्वी मोठा आवाज बीड, नेकनूर, मांजरसुंबा सह आदि गावच्या नागरिकांना आला होता. तसाच आवाज आज दुपारी 12.30 वाजण्याच्या दरम्यान आलेला आहे. या गुढ आवाजाबाबत वेगवेगळे तर्कही लावले जात असतात. काहींचे म्हणणे आहे की हा आवाज खदाणीमध्ये फुटलेल्या ब्लास्टींगचाही असू शकतो. मात्र या आवाजाबाबत नक्की काही सांगण्यात येत नाही.
 

Advertisement

Advertisement