Advertisement

पदवीधर मतदारसंघात प्रथमच महिलेने भरला उमेदवारी अर्ज

प्रजापत्र | Monday, 09/11/2020
बातमी शेअर करा

स्कूटीने केला बीड- औरंगाबाद प्रवास

 बीड :  . मराठवाड्यातील ८ जिल्ह्यासाठी असलेल्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी   निवडणूक प्रक्रिया सुरु असून  अनेक मोठ्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आपली ताकत दाखविण्यासाठी व्यस्त आहेत.परंतु सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी या पदवीधर निवडणुकीमध्ये राणीताई घाडगे यांनी अपक्ष उमेदवारी लढण्याचा निर्णय घेतला असून त्या पहिल्या महिला उमेदवार म्हणून या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत.   राणीताई घाडगे यांनी आज दिनांक 09 नोव्हेंबर रोजी बीड ते औरंगाबाद स्कूटीने प्रवास करुन उमेदवारी अर्ज भरला आहे.

 
 उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, राजकीय पक्षाकडून निवडून आलेले प्रतिनिधी हे अनेक प्रश्नांवर विधिमंडळात मौन  बाळगतात तर विधीमंडळात पदवीधरांचा आवाज बुलंद करण्यासाठी,तसेच पदवीधरांना रोजगार मिळाला  पाहिजे, त्यांचे नौकरीसठीचे परीक्षा शुल्क माफ झाले पाहिजे अशा एक ना अनेक समस्या मांडण्यासाठी  आणि विधीमंडळात पदवीधरांचा आवाज बुलंद करण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण ही निवडणूक लढवित आहोत.

Advertisement

Advertisement