नेकनूर-मांजरसुंबा मंडळात परतीच्या पावसाने हाहाकार माजविल्याने शेतकऱ्यांच्या पिकांची माती झाली झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली होती.त्यानंतर गुरुवारी (दि.२०) छत्रपती संभाजी महाराज यांनी सफेपुर वैतागवाडी या भागात पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देत, नुकसान भरपाईची मदत तात्काळ मिळण्यासाठी व दिवाळी गोड करण्यासाठी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचे सांगितले. यावेळी पूजा मोरे,गंगाधर काळकुटे यांच्या सह शेतकरी उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराजांनी वैतागवाडी येथील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला.
बातमी शेअर करा