Advertisement

जिल्ह्यात सात महसूल मंडळात अतिवृष्टी

प्रजापत्र | Friday, 07/10/2022
बातमी शेअर करा

बीड - 15 दिवसांच्या उघडीपनंतर रात्री बीड जिल्ह्यात काही ठिकाणी धो-धो पाऊस पडला. या पावसामुळे नद्या-नाल्यांना पाणी आले होते. काही धरणे तुडुंब भरली, खरीप पिकाचे नुकसान झाले. काढणीला आलेले सोयाबीन अतिरिक्त पावसाने खराब झाले. कापूस पीकही काही ठिकाणी पाण्यात आहे. सात मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

 

यामध्ये राजुरी नवगण, थेरला, अंमळनेर, आष्टी, कडा, पाचेगाव, उमापूर या मंडळांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यामध्ये रात्री धो-धो पाऊस पडला. या पावसामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले. हातोंडाला आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला. जिल्ह्यात यंदा सोयाबीन पिकाची सर्वाधिक लागवड झालेली आहे. सोयाबीन पिक काढणीला आलेले असताना रात्रीच्या पावसाने सोयाबीन पाण्यात आहेत. कापसाचेही नुकसान झाले. सात मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये नवगण राजुरी (71.3), थेरला (65.3), आष्टी (67.3), कडा (67.3), पाचेगाव (66.8), उमापूर (81.3) मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement