Advertisement

बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

प्रजापत्र | Saturday, 01/10/2022
बातमी शेअर करा

बीड-अखेर बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी राज्य शासनाने  आरक्षण सोडत जाहीर केली असून बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जाती साठी राखीव झाले आहे. यासोबतच उस्मानाबाद आणि लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसामान्य महिलांसाठी सुटले आहे. दरम्यान आता निवडणुकीनंतर अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

   आजघडीला राज्यातील सर्वच जिल्हा परिषद, पंचायत समिती वर प्रशासक आहेत.ओबीसी आरक्षणावरून निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने फेब्रुवारी2022 पासून जिल्हा परिषदेवर प्रशासक राज आहे.

 

दरम्यान 30 सप्टेंबर रोजी राज्य शासनाने 34 जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे आरक्षण जाहीर केले.यामध्ये बीडचे अध्यक्षपद हे अनुसूचित जाती साठी राखीव झाले आहे.बीड सोबतच मराठवाड्यातील परभणी चे अध्यक्षपद देखील अनुसूचित जाती साठी तर औरंगाबाद चे सर्वसाधारण साठी आरक्षित झाले आहे.

Advertisement

Advertisement