Advertisement

सलग तिसऱ्या दिवशी भगरीचा साठा जप्त

प्रजापत्र | Thursday, 29/09/2022
बातमी शेअर करा

बीड-नवरात्र उत्सव काळात भगर खाल्ल्यामुळे बीड जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक लोकांना उलटी,मळमळ याचा त्रास होऊ लागल्यामुळे अन्न प्रशासनाने तातडीने जिल्हाभर तपासणी मोहीम राबवित सलग चौथ्या दिवशी ११८ किलो भगरीचा साठा शिरूरमधून जप्त केला.गुरुवारी (दि.२९) सायंकाळी ५ च्या सुमारास अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी,अन्न सुरक्षा अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी ही कारवाई केली. 

 

            बीड जिल्ह्यात टायटन भगरीचा साठा मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांकडे आढळून येत असून ही भगर खाण्यासाठी योग्य नसल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांनी 'प्रजापत्र'शी बोलताना दिली.मागच्या चार दिवसांत बीड,गेवराई आणि शिरूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर भगर जप्त करण्यात येत आहे.बीड तालुक्यातून १८०० किलो,गेवराईच्या मोंढ्यातून ३०० किलो,उमापूरमधून ३५८ किलो आणि गुरुवारी शिरूरच्या मिलन एजन्सीमधून ११८ किलो भगरीचा साठा जप्त करण्यात आला आहे.दरम्यान विशेष म्हणजे मागच्या चार दिवसांत टायटन नावाची २५७६ किलो भगर अन्न प्रशासनाच्या वतीने जप्त करण्यात आली असून बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठया प्रमाणवर भगरीचा साठा जप्त होत असल्याचे समोर येत आहे. 

 

 

 

 

टायटन बँडची खाऊ नका भगर-हाश्मी 

सध्या बीड जिल्ह्यात ज्या लोकांना भगर खाल्ल्यामुळे त्रास होऊ लागला त्यांच्याशी आम्ही स्वतः संपर्क साधून माहिती घेतली.यावेळी टायटन ब्रँडची भगर खाल्यामुळे हा त्रास झाल्याचे समोर आले.बीड जिल्ह्यात मागच्या चार दिवसांत अडीच हजार किलो भगर आम्ही जप्त केली आहे.ही भगर उत्तरप्रदेशमधून तयार होत नाशिकला येते आणि तेथून बीड जिल्ह्यात पुन्हा विक्रीसाठी उपल्बध होत आहे.दरम्यान विशेष म्हणजे भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारियाखाली अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आहे.लोकांना दर्जेदार,निरोगी आणि पौष्टिक अन्न पदार्थ मिळावेत ही जबाबाबदारी एफएसएसएएआय (FSSAI) ची असते.मात्र टायटन या भगरीवर FSSAI चा कोणताही अधिकृत नंबर नसून त्याची बाजारात विक्री होत असेल तर प्रत्येकाने योग्य काळजी घेत ही भगर खाण्यासाठी टाळावी असे आवाहन अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement