मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज मोठा धक्का दिला आहे. राणे यांनी केलेले अतिरिक्त अवैध बांधकाम २ आठवड्यात पाडण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत .
मुंबई महानगर पालिका गड्डीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी परवानगी पेक्षा अधिकचे बांधकाम केल्याने ते वादात सापडले आहेत. हे बांधकाम नियमित करण्यासाठी राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र बांधकाम नियमित करण्याचे निर्देश देणे म्हणजे अतिरकमनाला प्रोत्साहन देणे असे होईल असे सांगत न्यायालयाने मुंबई महापालिकेला सदर बांधकाम २ आठवड्यात पाडण्याचे आदेश दिले आहेत. नारायण राणे यांना हा फार मोठा धक्का मानला जात आहे.
बातमी शेअर करा