माजलगाव -
डॉ.फपाळ हे काल सकाळी पोहण्यासाठी माजलगाव धरणात गेले होते परंतु त्यांना दम लागून ते पाण्यात बुडाले त्यांना शोधण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन च्या टीम ला बीड,परळी येथून पाचारण करण्यात आले होते शोधकार्य करत असताना यातील जवान हा पाण्यातील जाळयात फसला आणि अडकला त्याला वाचवण्यासाठी इतर दोन जवान गेले असता त्यातील राजू मोरे यांच्या ऑक्सिजन सिलेंडर निसटून वर आला आणि ते फसले.तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नातून ते सापडले बाहेर काढले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
तेलंगाव येथील प्रसिद्ध डॉक्टर दत्तात्रय फपाळ हे दि.१८ रोजी नेहमीप्रमाणे माजलगाव धरणाच्या जलाशयात पोहण्यासाठी गेले परंतु दम लागल्याने ते बुडाले त्यांना शोधण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध टीम जलाशयात दाखल झाल्या २४ तास उलटले तरी डॉ.फपाळ यांचा शोध लागत न्हवता त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन जवान हे शोधकार्यात उतरले परंतु त्यातील दोन सदस्य हे जलाशयातील जाळ्यात अडकून पडले त्यातील राजू मोरे यांच्या ऑक्सिजन सिलेंडर हा निसटला आणि ते अडकून पडले तर दुसऱ्या कर्मचाऱ्याला १५ मिनीटांनी बाहेर काढण्यात यश मिळाले मोरे यांना तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नातून बाहेर काढण्यात यश आले परंतु पाण्यात त्यांचा म्र्युतु झाल्याची घटना घडून आली घटनास्थळी जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,मुख्याधिकारी हे तळ ठोकून असून बचाव कार्यात कार्यरत असणाऱ्या जवानांवर देशपांडे हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.