Advertisement

पाण्यात बुडून डॉक्टराचा मृत्यु

प्रजापत्र | Sunday, 18/09/2022
बातमी शेअर करा

माजलगाव- मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या डॉ दत्ता फपाळ यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.पाणी जास्त असल्याने अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.घटनास्थळी महसूल आणि पोलीस प्रशासन दाखल झाले आहे.

माजलगाव तालुक्यातील बेलुरा येथील रहिवासी असलेले डॉ दत्ता फपाळ हे आपल्या मित्रांसोबत सकाळी पोहण्यासाठी गेले होते .पाण्याचा अंदाज न आल्याने आणि दम लागल्याने डॉ फपाळ हे बुडाले.मित्रांनी त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्यात त्यांना यश आले नाही.

घटनेची माहिती मिळताच माजलगाव च्या तहसीलदार आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.पाणी जास्त असल्याने शोध घेण्यास अडचणी येत आहेत.त्यामुळे एनडी आर एफ च्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement