पाथर्डी-परिघाबाहेरील करिअरचे आकाश शोधणाऱ्या आणि अथक परिश्रमातून तिथंपर्यंतचे ध्येय गाठणाऱ्या मुलांच्या पंक्तीत पाथर्डी तालुक्यातील बडेवाडी या छोट्या गावातील अभिनव पालवेचे नाव समाविष्ट झाले आहे.
केंद्रीय रेल्वेमध्ये लोको पायलट म्हणून अभिनवने स्टेअरिंग हाती घेऊन यशस्वी करिअरचा प्रेरणादायी प्रवास सुरू केला आहे.त्यांच्या या निवडीबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.
महाविद्यालयीन जीवनापासूनच करिअरची वेगळी वाट निवडण्याचे स्वप्न त्यांना खुणावत होते. त्यासाठी सतत शोधक नजर वर्तमानपत्रे, तज्ज्ञांची व्याख्याने यामध्ये नवं काही करण्याची ऊर्मी देणारे शब्द शोधायचे. दरम्यान, रेल्वे खात्यात लोकापायलट या पदासाठीची जाहीरात त्यांच्या वाचनात आली. अर्ज केल्यानंतरच अभिनव या पदाच्या परीक्षेच्या तयारीसाठी लागला. लेखी परीक्षेसोबत या पदासाठी मानसिक सक्षमतेचीही चाचणी द्यावी लागते. हजारो प्रवाशांचा जीव लोको पायलटच्या हातात असल्याने तसेच इमर्जन्सीमध्ये येणाऱ्या प्रसंगात त्वरीत निर्णय घेणे, प्रसंगावधान राखणे यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक असते. पूर्व, मुख्य आणि मानसिक चाचणी या परीक्षांमध्ये त्यांनी बाजी मारली आणि आता प्रशिक्षणाच्या दिशेने प्रवास सुरू होणार आहे. बडेवाडीसारख्या ग्रामीण भागातून थेट केंद्रीय रेल्वे विभागात मजल मारण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास तरुणांसाठी आदर्श उदाहरणं आहे. दरम्यान अभिनव पालवे हे हातगावचे जावई असून त्यांच्या निवडीबद्दल दादासाहेब ढाकणे (राष्ट्रीय संपर्कप्रमुख - वंजारी ओबीसी विकास महासंघ भारत) व दशरथ पालवे( प्रसिद्ध महाराष्ट्र मुकादम), संपूर्ण ढाकणे परिवार, पालवे परिवार,खेडकर परिवार ,तांदळे परिवार, आघाव परिवार ,बटुळे परिवार,खाडे परिवार, दहिफळे परिवार, जायभाय परिवार आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.