Advertisement

ओटीपी विचारून दीड लाखाला गंडवले

प्रजापत्र | Wednesday, 17/08/2022
बातमी शेअर करा

बीड -  एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर लिंक पाठवून केवायसी अपडेट करा व तुम्हाला आलेला ओटीपी मला सांगा, असे म्हणत एकाला 1 लाख 39 हजार 900 रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

राहुल अच्यूतराव कदम (रा. शिवाजीनगर, बीड) हे पुणे येथे नोकरीला आहेत. 15 ऑगस्ट रोजी बीड येथे आले होते. त्यावेळी त्यांच्या मोबाईलवर एकाने फोन करून ‘तुम्हाला लिंक पाठवली आहे, त्या लिंकद्वारे केवायएसी अपडेट करून घ्या, त्यामध्ये आलेला ओटीपी मला सांगा’, असे सांगितले. सुशिक्षित नोकरदाराने कशाचीही पडताळणी न करता आलेला ओटीपी त्या भामट्याला सांगीतला आणि त्याच्या अकाऊंटवरून 1 लाख 39 हजार 900 रुपये कपात झाले. ही घटना 15 ऑगस्ट रोजी घडली. आपल्या फसवणूक झाल्याचे राहूल कदम यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस गाठून भामट्याविरोधात तक्रार दाखल केली.
 

Advertisement

Advertisement