अविनाश इंगावले
गेवराई :
तालुक्यात अवैधरित्या वाळू उपसा करून चोरटी वाहतूक करणारी टोळी सक्रीय होती परंतू गुन्हे दाखल करून घेऊन त्यांच्यातून पळवाट काढून वाळू माफिया वाचत असत परंतू काही दिवसांपुर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी दोषारोपपत्र न दाखल झालेल्या गून्हात मालकांना आरोपी करा असे आदेश काढल्याने माफियासह प्रशासनात देखील खळबळ माजली आहे
तालुक्यातील नागझरी , राक्षसभूवन , म्हाळजपिंपळगाव , गूळज , सावळेश्वर , रेवकी , संगमजळगाव , राजापुर , काठोडा , हिंगनगाव , शहागड , यासह अनेक ठिकाणावरून गोदापात्रातून अवैध रित्या वाळूची वाहतूक करणा-या वाहनावर कार्यवाही केली जायची मालक सदरच्या गून्ह्यात चालकाला शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर नोटरी करून चालकावर गून्हा दाखल व्हायचा मात्र दोषारोपत्र न दाखल झालेल्या गून्ह्यात मालकाला आरोपी करा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यावर बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील दोषारोपपत्र न गेलेल्या गून्ह्याची संख्या यादीनुसार दिली आहे. त्यात पाच महिन्यात गेवराई तालुक्यातील गेवराई , तलवाडा , चंकलाबा या तिन पोलीस ठाण्यात ४१ गून्हाची नोंद करण्यात आली आहे पाच महिन्यांत वाळू चोरीचे ऐवढे प्रमाण आहे तर वर्षभरात कीती ? गून्हे दाखल होतात यावरून तालुक्यात वाळू उपसा कीती होतो यांचा अंदाज बांधता येत नाही तसेच पोलीस प्रशासनासह महसुल व माफिया खळबळ माजली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे .