Advertisement

ज्योतिराम घुलेंकडे महाराष्ट्राचे कर्णधारपद

प्रजापत्र | Wednesday, 10/08/2022
बातमी शेअर करा

बीड दि.10(प्रतिनिधी):- भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे कर्णधारपद गाजविणारे ज्योतिराम घुले यांना आता महाराष्ट्राच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. देशाच्या विविध राज्यातील संघामध्ये 16 ऑगस्टपासून टी व्टेंटी क्रिकेट चॅम्पियनशीप खेळविण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्राचे नेतृत्व बीडचा तरुण खेळाडू करणार असल्यामुळे जिल्हावासियांसाठी ही गौरवाची बाब आहे.

ज्योतिराम घुले हे केज तालुक्यातील डोणगांव येथील ऊसतोड मजुरांचा मुलगा आहे. त्यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या आधारावर भारतीय संघाचे कर्णधारपद पटकविले होते.आता त्यांना महाराष्ट्राच्या संघांचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेटबोर्डाचे अध्यक्ष संजय चव्हाण, चेअरमन विजय घोळवे आणि मार्गदर्शक सुरेंद्र खेडकीकर यांनी अभिनंदन केले आहे.

दरम्यान 16 ऑगस्ट पासून आंध्रप्रदेशच्या विजयवाडा येथे टी व्टेंटी क्रिकेट चॅम्पियनशीप होणार आहे. आठ संघामध्ये हे सामने पार पडणार असून देशभरातील अनेक संघ एकमेकांना भिडणार आहेत. विशेष म्हणजे ज्योतिराम घुले यांनी भारतविरूध्द बांगलादेशच्या संघामध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाला 2-1 ने मोठा विजय मिळवून दिला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधारपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर ज्योतिराम घुलेंनी आपले वेगळेपण सिध्द केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने एक दिवसीय आणि टी-20 सामन्यात विजय मिळविला असून केवळ एक सामना भारतीय संघ पराभूत झाला आहे. आता महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट टीम त्यांच्या नेतृत्वाखाली खेळणार असून या संघात बीडच्या राजू चव्हाण,अनिल अडे,आशिष पनारकर यांचा समावेश आहे..या सोबतच हितेश पाटील, शहादेव बर्डे, शैलेश पाटील, दिपेंद्र वाघ, आनंद भोटवाल, शरद कालमे, , मंगेश जाधव, अक्षय रत्नपारखे, हमीद काझी, कल्पेश ठाकूर, बाबा पवार, नंदू पाटील, देवेंद्र तागड महाराष्ट्राकडून खेळणार आहेत.

Advertisement

Advertisement