बीड (प्रतिनिधी) मोबाईल - क्रमांकावर आलेल्या टेक्स्ट मॅसेजमधील लिंकवर क्लिक करताच व्हॉट्सअॅप चॅट ओपन झाले. त्यावर समोरच्या अज्ञात व्यक्तीने वेगवेगळे टास्क दिले. त्यातुन एका विद्यार्थ्याची ९० हजार ९५० रूपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बीड शहरातील प्रथमेश क्षीरसागर यांच्या मोबाईलवर लिंकच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खात्यातील ९० हजार ९५० रूपयांसह कमिशनची रक्कम फ्रिज करून फसवणूक केल्याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोनि. सानप हे करीत आहेत.
बातमी शेअर करा