बीड, (प्रतिनिधी) शहरातील पेठ बीड ठाण्याच्या हद्दीत सारडा जिनिंगच्या कंपाऊंडच्या आत मध्ये मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून १९ जणांना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून सहा लाख ७५ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे पेठ बीड ठाण्याच्या हद्दीत जाऊन एलसीबीने कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बीड शहरातील सारडा जिनिंग कंपाऊंडच्या आतील भागात तिरट नावाचा जुगार खेळताना पोलिसांनी छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी शेख सादेक शेख अहमद, शेख रज्जाक शेख उस्मान अशोक रामभाऊ भाले, दीपक रूपचंद लोहारे, आसाराम वसंत जाधव, हकीम मुर्तुजा शिकलकर आकाश लक्ष्मण गायकवाड आकाश भिमराव सिरसाट, बालाजी भगवान पवार, दीपक कचरू सवाई राहुल राजेंद्र गायकवाड, शेख कादर शेख करीम, लहू विठ्ठल गायकवाड, अनिल भीमराव कोरडे संतोष छगन वाघमारे, संकेत , चंद्रकांत तांगडे, अशोक हरिभाऊ गायकवाड, पंकज श्रीमंत गायकवाड आणि अमोल शांतीलाल जाधव या १९ जणांना जुगार खेळताना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून रोख रक्कम मोबाईल मोटरसायकल असा ६ लाख ७५ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, डीवायएसपी संतोष वाळके, पोलीस निरीक्षक सतिश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी शेख नसीर, मनोज वाघ, जाधव, कातकडे, हंगे, ठोंबरे, जमदाडे, कदम, दुबाले, ठाकूर, शिंदे, मराडे, कोरडे यांनी केली.
प्रजापत्र | Sunday, 31/07/2022
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा